ताज्या बातम्या

अहमदनगर नामांतराच्या प्रस्तावाबाबत ठराव मांडा, सरकारचं महापालिकेला पत्र

शिंदे-भाजप सरकारकडून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

शिंदे-भाजप सरकारकडून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर' अशी लक्षवेधी आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानपरिषदेत मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याचे उत्तर दिलं होतं.

महापालिका अधिनियमात असा कोणताही ठराव करण्याची तरतूद नाही. तसंच नगर जिल्हाचं नाव बदलणं हे महापालिकेच्या अखत्यारित येत नसतानाही सरकारने ठराव मागितला आहे. त्यामुळे याबाबत काय निर्णय घ्यावा या पेचात महापालिका प्रशासन सापडलं आहे.अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली. नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 533 वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे. अहमदनगरचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरुन करण्याची मागणी केली असली तरी यापूर्वीच शिवसेनेकडून अहमदनगरचं नाव 'अंबिकानगर' करावी अशी मागणी झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारने महापालिकेला पत्र पाठवून महासभेत नामांतराचा प्रस्ताव घेऊन बहुमताचा ठराव पाठवण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार महापालिका प्रशासनाने नामांतराचा विषय महासभेत ठेवण्याची भूमिका घेतली आहे. नगर महापालिकेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे नामांतराच्या ठरावाला नगरसेवक कसा प्रतिसाद देतात मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य