अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार आज आपल्या अर्थ संकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. नवीन महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.
दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. शेषराव वानखेडेंनी सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला असून अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.
या अर्थसंकल्पातून अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
आतापर्यंत कोणी, किती वेळा अर्थसंकल्प सादर केला
● बॅ. शेषराव वानखेडे - 13 कॉंग्रेस
● अजित पवार - 11 - राष्ट्रवादी
● जयंत पाटील - 10 राष्ट्रवादी
● सुशीलकुमार शिंदे - 9 कॉंग्रेस
● बॅ. रामराव आदिक - 7 कॉंग्रेस
● सुधीर मुनगंटीवार - 6 भाजप
● मधुकरराव चौधरी - 5 कॉंग्रेस
● यशवंतराव मोहिते - 4 कॉंग्रेस
● एकनाथ खडसे - 3 भाजप
● स. गो. बर्वे - 2 कॉंग्रेस
● महादेव शिवणकर - 2- भाजप
● दिलीप वळसे पाटील - 2- राष्ट्रवादी
● शंकरराव चव्हाण - 1 कॉंग्रेस
● देवेंद्र फडणवीस - 1 भाजप
● गोपीनाथ मुंडे - 1भाजप'
● सुनील तटकरे - 1 राष्ट्रवादी
● डॉ. व्ही. सुब्रमण्यम - 1 कॉंग्रेस