अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प मांडणार; कोणत्या मोठ्या घोषणा करणार? संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार आज आपल्या अर्थ संकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. नवीन महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निकालात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दुपारी 2 वाजता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. शेषराव वानखेडेंनी सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला असून अजित पवार यांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पातून कोणत्या घोषणा करण्यात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.