ताज्या बातम्या

अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह आवरेना; देवेंद्र फडणवीस निघून गेले अन् अजित पवार बसले थेट उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. या व्यासपीठावर राखीव असलेल्या खुर्चीवर संबंधित व्यक्तींचे नाव लिहिण्यात आले होते. त्यानुसार, क्रीड व युवक कल्याण मंत्री गिरिश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार एका रांगेत खुर्चीवर बसले होते.

या कार्यक्रमाच्यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन होताच देवेंद्र फडणवीस दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघून गेले. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री असे लिहिलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अजित पवारांसाठी राखीव असलेली खुर्ची तेव्हा रिकामीच होती.काही वेळानंतर अजित पवार भाषण करण्यासाठी उठले. तेवढ्यात बालेवाडी क्रीडा संकुलनातील दुसऱ्या एटीपी चॅम्पियनशिप पारितोषिक समारंभाला गेलेले फडणवीस परतले आणि आपल्या खुर्चीवर बसले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mediclaim : विमा कंपन्यांकडून आरोग्य विमा क्लेमसाठी 24 तासांची अट शिथिल

Ajit Doval : 'तुमच्याकडे भारतात झालेल्या नुकसानीचा एकतरी फोटो आहे का?'; अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा