बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच कारागृहातील अधिकारी बक्सार मुलाणी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे हे सर्व सहकार्य करत असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता देशमुख कुटुंबाकडून जेल प्रशासनाकडे तक्रार केली जाणार आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार असल्याचे देशमुख कुटुंबाच्या सदस्यांनी सांगितले असल्याची माहिती मिळत असून याबाबतची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.