थोडक्यात
WhatsAppला पिछाडत नंबर 1 बनलं Arattai
अनेकजण व्हॉट्सअपला अनइंन्टॉल करून अरत्ताई डाऊनलोड करत आहेत
अॅपस्टोअरवर नंबर एकवर गेलेल्या अरत्ताईचा अर्थ नेमका काय?
अल्पावधित लोकप्रिय झालेल्या आणि व्हॉट्सअपला टक्कर देणाऱ्या भारतीय बनावटीच्या अरत्ताईनं (Arattai) अक्षरक्षः धुमाकूळ माजवला आहे. अनेकजण व्हॉट्सअपला (WhatsApp) अनइंन्टॉल करून अरत्ताई डाऊनलोड करत आहेत. पण, अॅपस्टोअरवर नंबर एकवर गेलेल्या अरत्ताईचा अर्थ नेमका काय? झोहो अन् अरत्ताई बनवणाऱ्या मेकरचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो किंवा यूजर्स असो सर्वांच्या तोंडी एकचं नाव आहे आणि ते म्हणजे अरत्ताई. हे अॅप झोहो कॉर्पोरेशनने विकसित केले आहे. या अॅपवर साइन-अप करणाऱ्यांची संख्या तीन दिवसांत 100 पट वाढली असून, हे अॅप iOS आणि Android दोन्हीसाठी उपलब्ध आहे.तगडी स्पर्धा हे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपशी करेल असेही बोलले जात आहे.
झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू कोण आहेत?
झोहो कॉर्पोरेशनची स्थापना श्रीधर वेम्बू यांनी केली असून, याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. आयआयटी मद्रासमधून बी.टेक पूर्ण केल्यानंतर वेम्बू न्यू जर्सी येथील प्रिन्सटन विद्यापीठात गेले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील क्वालकॉम या कंपनीत काम केले. काहीकाळ श्रीधर वेम्बूने यांनी अमेरिकेत काम केल्यानंतर अमेरिका आणि अमेरिकन कंपनी दोन्ही सोडले आणि भारतात परतले. त्यानंतर अॅडव्हेंटनेट नावाची कंपनी त्यांनी 1996 मध्ये सुरू केली, ज्याचे कॉर्पोरेशन असे नामकरण 2009 मध्ये झोहो करण्यात आले. वेम्बू यांच्या नेतृत्वाखाली, झोहो कॉर्पोरेशनने लक्षणीय यश मिळवले आणि सॉफ्टवेअर अॅज अ सर्व्हिस (SaaS) उद्योगात अनेक नवीन स्वदेशी अॅप्स आणि साधने सादर केली.
एक्सवर पोस्ट केला झोहोचा प्रवास
श्रीधर वेम्बूने यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी झोहोपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. प्रवासाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन करण्यासाठी वेम्बू यांनी एक ग्राफिक शेअर केले आहे. ज्यात ते म्हणतात की, जगातील एकमेव उत्पादन सूटच्या विस्तृत आणि खोलीत मायक्रोसॉफ्टला टक्कर देऊ शकणारी आमची एकमेव कंपनी आहे. आमची उत्पादने मायक्रोसॉफ्टपेक्षा खूपच उत्कृष्ट अनुभव देतात असेही श्रीदर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Zoho कंपनीचे प्रोडक्ट कोण-कोणते?
– बिझनेस आणि ऑफिस टूल्स Zoho कडे उपलब्ध आहेत. जी मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्टप्रमाणे सर्व्हिस देतात.
– Zoho Mail- सुरक्षित ईमेल सर्व्हिस.
– Zoho Writer-ऑनलाईन डॉक्यूमेंट एडिटर टूल.
– Zoho Sheet-स्प्रेडशीट टूल.
– Zoho Show- प्रेझेंटेशन मेकरचे काम करते.
– Zoho Notebook- नोट्स तयार करणारे अॅप
– Zoho Cliq- टीम मीटिंग, चॅटिंग आणि मॅसेजिंग टूल.
– Zoho Meeting- ऑनलाईन मीटिंग आणि व्हिडियो कॉन्फरन्सिंगसाठी वापरले जाते.
– Zoho WorkDrive- क्लाउड स्टोअरेज आणि फाइल शेइरिंगची सुविधा देते.
– Zoho Books- अकाउंटिंग आणि इनवॉइसिंग सॉफ्टवेयर.
– Zoho People- HR आणिएम्प्लॉई मॅनेजमेंटसाठी तयार करण्यात आलेले टूल.
– Zoho Recruit- सॉफ्टवेयर हायरिंग आणि रिक्रूटमेंटसाठी वापरात येणारे .
– Zoho Social- सोशल मीडिया मॅनेजमेंट टूल.
– Zoho Marketing Automation- ऑटोमेटेड मार्केटिंग सॉल्यूशन
– Zoho Creator- कस्टम अॅप बनवणारे प्लेटफॉर्म.
– Arattai- व्हाट्सअॅपसारखेच पण स्वदेशी चॅटिंग अॅप.
– Zoho Vault-पासवर्ड मॅनेजर
– Zoho Expense- खर्च ट्रॅक करणारे अॅप
अरत्ताई अॅपचे खास फिचर्स कोणते?
1. टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेज – तुम्ही कोणत्याही व्यक्तीला किंवा ग्रुपला या अॅपद्वारे त्वरित मेसेज किंवा व्हॉइस मेसेज पाठवू शकता.
2. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल्स – या अॅपद्वारे तुम्ही हाय-डेफिनिशन कॉल्स करू शकता, हे पूर्णपणे सुरक्षित अॅप आहे.
3. मीडिया शेअरिंग – तुम्ही तुमचे कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ आणि इतर फाइल्स या अॅपद्वारे सहज शेअर करू शकता.
4. स्टोरी – या अॅपद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपप्रमाणेच 24 तासांसाठी स्टेटस ठेवू शकता.
5. चॅनल- व्हॉट्सअपप्रमाणे तुम्ही तुमच्या नावाने चॅनल तयार करू शकता त्यात पोस्ट करू शकता.
6. ग्रुप – तुम्ही 1 हजार सदस्यांसह या अॅपमध्ये ग्रुप चॅट करू शकता.
7. मल्टी-डिव्हाइस सपोर्ट – तुम्ही मोबाईल, डेस्कटॉप आणि अँड्रॉइड टीव्हीसह 5 डिव्हाइसवर एकाच वेळी लॉग इन करू शकता.
8. डेटा स्थानिकीकरण – तुमचा डेटा राष्ट्रीय डेटा गोपनीयता नियमांचे पालन करून, भारतात सुरक्षितपणे संग्रहित केला जाणार.
9. जुन्या फोनवरही काम करेल – स्लो इंटरनेट आणि जुन्या फोनवरही सहज काम करते.

Arratai चा अर्थ नेमका काय?
अरत्ताई हा तमिळ शब्द असून, Arattai या नावाचा अर्थ ‘अनौपचारिक गप्पा’ म्हणजेच Casual Chat असा होतो. दररोजच्या संवादासाठी साधा मेसेजिंग ॲप. Zoho ने लॉन्च केलेल्या या ॲपद्वारे वापरकर्ते मेसेज, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करू शकतात, तसेच व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, स्टोरीज शेअर करणे आणि चॅनेल व्यवस्थापन करण्यासही सक्षम आहे.