पुढच्या 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरु होईल. आम्ही पुढील 2026 च्या 23 नेवारी आधी हे स्मारक लोकांच्या चरणी आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा देणारं स्मारक होईल. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, अशी मोठी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांच स्वागत करत ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले काही वर्ष या स्मारकाचं काम चालू आणि चर्चा पण सुरु आहे. मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट कारण हे काम आता खुप छान वाटत आहे पण करण खुप कठीण होत. देसाई साहेब आणि आदित्य या दोघांनी या जागेचं महत्त्व सांगितलं. योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही बाजूलाच आहे.
पण या जागेतलं आव्हान म्हणजे महापौर बंगला. ही जागा नुस्ती वास्तू नसून आम्ही या वास्तुसोबत भावनात्मक बंधनामध्ये जोडलेलो आहोत. आतापर्यंत शिवसेनाप्रमुखांच्या अनेक बैठका इथे झाल्या आहेत. तसेच युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. हा महापौर बंगला हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्त्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं खूप कठीण होतं".