ताज्या बातम्या

भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल, जमिनीच्या वादातून महिलेला केलं विवस्त्र?

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी आमदार धस यांनी केली.

Published by : shweta walge

भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी आमदार धस यांनी केली. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या आमदाराच्या पत्नीचं या गुन्ह्यात नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आमदाराच्या पत्नीवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. 

शेतात मका काढणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली. यात तिचा विनयभंग ही केला गेला. घटना 15 ऑक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे उघडकीस आली. याप्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघां विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

दरम्यान, या घटनेचा कथित व्हिडिओ देखील सध्या सोशल माध्यमातून वायरल झाला आहे. व्हिडिओत दिसणारी पीडिता शेतात मका काढत होती. याच वेळी गावातील रघु पवार आणि राहुल जगदाळे हे तिथे आले आणि त्यांनी पीडीतेला मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. याच ठिकाणी पीडीतेची सून धावत आली तिने हा व्हिडिओ तयार केला. याच ठिकाणी प्राजक्ता धस देखील होत्या. त्यांनी पीडितेला मारहाण करा असे सांगितले. दरम्यान आता या सर्व प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pitbull Attack : संताप ! लहान मुलाच्या अंगावर चक्क पिटबुल जातीचा कुत्रा सोडला आणि...

Sonam Raghuwanshi : नवऱ्याच्या खुनाचा पश्चात्ताप नाही , टीव्ही पाहते आणि...; असं जगते सोनम रघुवंशी तुरुंगात आयुष्य

Sachin Pilgaonkar : "पाय अधिक आकर्षक...", सचिन पिळगावकर 'त्या' अभिनेत्रीबद्दल काय म्हणाले ?

Amruta Fadnvis : अमृता फडणवीस यांना पुणे सत्र न्यायालयाची नोटीस; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण