सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चांनी जोर धरुन ठेवला आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याचसोबत दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी युती करण्याची शक्यता वर्तावली आहे.
याचपार्श्वभूमीवर ठाकरेंचे मामा म्हणजेच, चंदूमामा वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यास आनंदच आहे मी गेली कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहे, असं ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी म्हटल आहे. "लेट बेटर दॅन नेव्हर, लवकरात लवकर चांगली बातमी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना" असं चंदूमामा वैद्य यांनी म्हटल आहे. चंदूमामा वैद्य हे ठाकरेंचे मामा आहेत.
याचपार्श्वभूमीवर पुढे चंदूमामा वैद्य म्हणाले की, "निवडणूक या येतील जातील हा प्रश्न नाही, माझी इच्छा दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी आयुष्यभर लढावं जपावं महाराष्ट्राची उन्नति कशी होईल यासाठी दोघांनी पावलं उचलावी. दोघांना सल्ला मी बरीच वर्षे देतोय पण दोघेही आता थोडेशे सकारात्मक झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत साहेब जास्तीत जास्त मदत करत आहेत त्यांचे प्रयत्न देखील आहेत त्यांना देखील स्वामी समर्थांचा थोडंसं वरदान अस वाटत ते अशक्य ते शक्य करून दाखवतात गेल्या वेळेसही त्यांनी केलेला आहे यावेळेस ते करतील अशी माझी आशा आहे एवढ्याच आपण इच्छा ठेऊन पुढे बघायचं".