ताज्या बातम्या

Cm Devendra Fadnavis : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 70 लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 70 लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे, ज्यामुळे शाळा, घरे आणि इतर पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्या आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • अतिवृष्टीमुळे अंदाजे 70 लाख एकर पिकांचे नुकसान

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2,215 कोटींची रक्कम जाहीर!

  • बीड, धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरू

महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अंदाजे 70 लाख एकर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे, ज्यामुळे शाळा, घरे आणि इतर पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्या आहेत. राज्यातील कॅबिनेटची बैठक सुरू असताना, शासनाने मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

2,215 कोटींची मदत

खरीप 2025 सत्रासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Heavy Rain) 2,215 कोटी रुपये वितरण करण्याचा निर्णय घेण्यात (Flood) आला असून, 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तातडीने जमा (Farmer) होणार आहे. विभागाने याबाबतचा शासन निर्णय मदत व पूनर्वसन अधिकृतपणे (Devendra Fadnavis) जाहीर केला आहे.

70 लाख एकर पिकांचे नुकसान

विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. विदर्भातील जिल्हे आणि मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, बीड यांसह काही भाग गंभीर नुकसानग्रस्त आहेत. सध्या पावसामुळे काही भागांमध्ये पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत; पाणी ओसरल्यावर तिथे पंचनामे करणे सुरू केले जाईल. राज्यातील प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवत असून, नुकसानग्रस्त भागांसाठी तातडीची मदत देण्याची तयारी सुरु आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू

याशिवाय, जून 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने 1,339 कोटी रुपये अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. बीड, धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत, ज्यात हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका केली जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, तसेच काही पश्चिम महाराष्ट्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांची पिकं तुडुंब पाण्याखाली गेल्यामुळे आर्थिक हानीही मोठी झाली आहे. याशिवाय, पाण्याच्या तडाख्याने काही ठिकाणी जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. रहिवासी सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहेत. प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले असून, मदतकार्य सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Suresh Dhas : पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषणा

Flipkart Big Billion Sale : फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोठा झोल, Iphone ची ऑर्डर आपोआप रद्द?

Make Fasting Gulab jamun during Navratri : आता नवरात्रीमध्ये बनवा उपवासाचे गुलाबजाम

National Film Awards 2025 : शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर! जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी