ताज्या बातम्या

CM Eknath Shinde : 4 जूनला विजयाची गुढी संपूर्ण देशात उभी केली जाईल

Published by : Siddhi Naringrekar

गुढीपाडव्यानिमित्त आज संपूर्ण राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शोभायात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यासह विविध शहरांमध्ये शोभायात्रांचं आयोजन करण्यात येते.

ठाणे शहरात आज नववर्षाच्या स्वागतासाठी यात्रा मोठ्या जल्लोषात पार पडते. या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा. सरकारने सण, उत्सवावर असणाऱ्या बंद्या उठवून टाकल्या. मोठा उत्साह आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे.

तसेत मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, 4 जूनला विजयाची गुढी संपूर्ण देशात उभी केली जाईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या देशामध्ये बहुमताचे सरकार स्थापन होईल. फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार 400 पार असा जो निर्धार आहे तो पूर्णत्वास जाईल. 4 जूनला देशात विजयाच्या गुढ्या उभारल्या जातील. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा