पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये प्रचार सभा पार पडली. या सभेच्यावेळी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना एका तरुणाने कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी केली. याप्रकरणी किरण सानप या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं. त्यानंतर आज किरण सानप या तरुणाने शरद पवार यांची भेट घेतली. किरण सानप हा आमच्या पक्षाचा असेल तर मला त्याचा अभिमान असे शरद पवार यांनी काल वक्तव्य केलं होत.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. किरण सानप म्हणाला की, आमचा निफाड तालुका कांद्याची पंढरी आहे. यावेळी पंतप्रधान इथे येतात. त्यावेळी शेतकऱ्यांचा हा मोठा मुद्दा आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो गाजतोय. कांदा विषयावर त्यांनी बोलण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण करण्यासारखी वक्तव्य त्यांनी केली.

मी 15 मिनिटं त्यांची वाट पाहिली की ते कांदा विषयावर आता तरी बोलतील. मला जाणवलं नाही कि ते आता बोलतील. पर्यायाने मला न राहावून त्यांना म्हटलं की तुम्ही कांद्यावर बोला. मी त्यावेळी सामान्य शेतकरी म्हणून त्याठिकाणी गेलो होतो. मी पवार साहेबांच्या नावाने तिथे घोषणा दिल्या नाहीत, मी कोणत्या पक्षाच्या नावाने घोषणा दिल्या नाहीत. मी तिथे फक्त सामान्य शेतकरी म्हणून गेलो होतो. पवार साहेबांची मी कार्यकर्ता आहे. असे किरण सानप म्हणाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com