Admin
ताज्या बातम्या

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देणार?

पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपाचं टेन्शन वाढणार आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडल्याने रवींद्र धंगेकर चांगलेच चर्चेत आहेत.

येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल यासाठी नावांची चाचपणी सुरु झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे