रिध्देश हातिम|मुंबई: तुम्ही जर मुंबईत नेहमी बेस्ट बसणे गर्दीत प्रवास करत असाल तर आपल्या मोबाईलची काळजी घ्या. कारण, मुंबईतील गुन्हे शाखा युनिट 12ने अशा चोरांच्या टोळीस जेरबंद केले आहे. ज्यांनी आतापर्यंत 65 हून अधिक मोबाईल बेस्ट बसमधून गर्दीचा फायदा घेत चोरले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 12 यांना गुप्त सूत्रांत द्वारे माहिती मिळाली की मालाड पूर्व येथील मिनी बार बस स्टॉप लिंक रोड जवळ बस स्थानकावरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन जण आले आहे माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस अधिकाऱ्यांनी बस स्थानकावर सापळा रचला. बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी टोळीतील तीन जण बस मधून उतरून लोकांच्या खिशातील मोबाईल चोरी करताना दिसले. गुन्हे शाखाच्या पथकाने चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल चोरांनी रिक्षात बसून पळ काढली मात्र तिन्ही आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले.
त्यांची झडती घेत असता त्यांच्याकडून 12 मोबाईल आढळले. चौकशी दरम्यान टोळीतील अजून दोन चोरांना पोलिसांनी अटक केले. मोबाईल चोरांकडून पोलिसांनी 68 मोबाईल आणि एक रिक्षा जप्त केले. चोरीच्या मोबाईलची बाजार भाव जवळपास 6 लाख 50 हजार एवढी आहे अटक आरोपींचे नाव मोहम्मद अलीम खान (29), मोहम्मद अली अझल खान (52), शकील अहमद मोहम्मद सादिक अन्सारी (59), आशिफ मोहम्मद शेख (31) आणि रिक्षाचालक महेंद्र रमेश झाजरे (34) असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.