म्यानमारनंतर आता नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. नेपाळमध्ये हा भूकंप संध्याकाळी ७.५५ च्या सुमारास झाला आहे. यासोबतच नेपाळबरोबर उत्तर भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची खोली जमिनीपासून 20 किलोमीटर खाली होती. या भूकंपामुळे अद्याप नुकसान झाल्याची माहिती मिळत नाही आहे.
उत्तराखंडमधील पिथौरागढ हे भूकंपाचे केंद्र होते. याच्याआधी म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ तीव्रतेचा तीव्र भूकंप झाला होता.