पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेने आपला जीव गमावल्याची बातमी समोर आली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या उपचारासाठी तिच्या कुटुंबाकडे दहा लाखांची मागणी केली होती. ज्यामुळे तिचा दुर्दैवी अंत झाला. या सगळ्या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिसे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सगळी चूक काही हॉस्पिटलची नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच होता. मात्र, मंगेशकर कुटुंबियांना खूप कष्टातून हे रुग्णालय उभारलेले आहे. खूप नावाजलेलं रुग्णालय आहे. सगळी चूक काही हॉस्पिटलची आहे असे म्हणणे योग्य नाही. चूक चूक आहे, पण आज त्यांनी पत्र लिहून काही निर्णय घेतला असेल तर त्याचा मला आनंद आहे. शोबाजी करण चुकीचे आहे, कोणीही अस करत असेल तर ते चुकीचं आहे".
भविष्यात अशा गोष्टी घडू यासाठी प्रयत्न केला जाईल
"आवाहल येईपर्यंत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, त्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. सर्व प्रकारच्या गोष्टीची दखल कमिटी घेतील. भविष्यात अशा गोष्टी घडू यासाठी एसओपी तयार झाले पाहिजेत, असा प्रयत्न केला जाईल. आपला प्रयत्न आहे की, धर्मदाय व्यवस्था सगळ ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे आपल्याला कळेल कुठे किती बेड उपलब्ध आहेत, ते रुग्णांना दिले जातात की नाही. तसेच मुख्यमंत्री कार्यालयात असलेला मुख्यमंत्री आरोग्य कक्षही याच्याशी जोडण्याचा आमचा प्रयत्न सुरु असल्याचं" देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.