Mumbai cha Raja 2025 : गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. 27 ऑगस्टपासून देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. लाडक्या बाप्पाच्या तयारीसाठी नागरिकाची लगबग पाहायला मिळत नाही. आज 25 ऑगस्टला मुंबईतील मानाचा गणपती म्हणजेच मुंबईच्या गणेश गल्लीतील प्रथम दर्शन सोहळा पार पडला आहे.
मुंबईतील जुना गणपती म्हणून मुंबईच्या राज्याकडे पाहिले जाते. अनेक मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या राज्याचे भक्त आता दर्शनासाठी सज्ज झाले आहेत.