चैत्र शुद्ध नवमीचा दिवस म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. त्यामुळे प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी संपुर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. यंदा राम नवमी 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. रामनवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र असा सण मानला जातो. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम तसेच त्याग, कर्तव्य, आणि न्यायासाठी ओळखले जाते. याचपार्श्वभूमीवर रामनवमीनिमित्त आपल्या मित्रपरिवाराला तसेच प्रियजनांना द्या हटके शुभेच्छा.
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम,
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं,
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम नाम ज्याच्या मुखी,
तो नर धन्य तिन्ही लोकी,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री राम राम रामेति,
रमे रामे मनोरमे,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांचा कर्म धर्म आहे,
ज्यांची वाणी सत्य आहे,
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे,
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!