Maharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखलMaharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल

Maharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल

नागपूर पूर: संततधार पावसामुळे नागपूरमध्ये गंभीर पूरस्थिती, एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल.
Published by :
Team Lokshahi
Published on

Nagpur Weather : नागपूर शहरावर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गंभीर पूरस्थिती निर्माण केली आहे. विशेषतः हुडकेश्वर परिसरातील पोहरा नदीला आलेल्या पुरामुळे पाणी रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरले आहे. नरसाळा भागातही नाल्याचे पाणी घरांमध्ये घुसल्याने नागरिकांची मोठी त्रेधा उडाली आहे.

काल रात्रीपासून अनेक नागरिक घरात अडकून पडले होते. परिस्थितीचा अंदाज घेत एनडीआरएफचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी रेस्क्यू बोटच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू केले आहे. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत आठ जणांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, काही नागरिक अद्यापही आपल्या घरांच्या छतांवर अडकलेले आहेत.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पहाटेपासून पाण्याचा स्तर अधिकच वाढला, आणि काही नागरिक पूर्णपणे पाण्यात अडकले. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधत मदतीची मागणी केली असता, प्रशासनाने त्वरित प्रतिसाद देत बचावकार्य सुरू केले.

तथापि, पावसाचा जोर कायम असल्यामुळे आणि पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर आव्हान कायम आहे. घरांमध्ये अडकलेल्यांना आणखी एकदा रेस्क्यू करावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आणि नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत.

हेही वाचा...

Maharashtra Rains : नागपूरमध्ये पावसाचा कहर; नद्यांना पूर , एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल
Jayakwadi Dam : मराठवाड्यातील पाणी प्रश्न सुटणार! जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढला
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com