Paithan Team Lokshahi
ताज्या बातम्या

पैठण येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅली

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पैठण शहरातील आंबेडकर अनुयायी शहरात अभिवादन रॅली काढत महामानवाला पुष्प वाहून अभिवादन केले.

Published by : Sagar Pradhan

सुरेश वायभट|पैठण: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पैठण शहरातील आंबेडकर अनुयायी शहरात अभिवादन रॅली काढत महामानवाला पुष्प वाहून अभिवादन केले. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महीला, पुरुष सहभागी झाले होते.

पैठण शहरातील पावर हाऊस येथून सकाळी श्रावस्थी बुद्ध विहारात वंदना घेण्यात आली. त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. रॅली बसस्थानक. परीसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात आल्या नंतर उपस्थित भिम अनुयायांनी महामानव यांना अभिवाद केले.यावेळी प्राध्यापक लखण चव्हाण यांचे व्याख्यान झाले.

पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, नगर परीषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे, अरुण बल्लाळ, जालिंदर आडसुळ, रावसाहेब आडसुळ, महेंद्र साळवे, बंडु अंधाळे, अशोक पगारे, राजु गायकवाड, अजित पगारे, राजेंद्र उगले, प्रकाश निकाळजे, जगन्नाथ साळवे, स्वप्नील साळवे, यांच्या सह मोठ्या संख्येने भिम अनुयायी उपस्थित होते

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा, नेमकी प्रक्रिया कशी जाणून घ्या...