ताज्या बातम्या

चिपळूणच्या आजी-माजी आमदारांनी सुचविलेल्या सेम टु सेम कामांना पालकमंत्र्याची मंजुरी

Published by : Sagar Pradhan

निसार शेख। चिपळूण: पालकमंत्री ना. उदय सामंत शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर आले असता शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने त्यांच्या हस्ते करण्यात आली. याचदरम्यान आपण सुचविलेल्या शहरातील एक कोटीहून अधिक रकमेच्या विकासकामांना पालकमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचे आजी-माजी आमदारांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु ही विकासकामे 'सेम-टू-सेम निघाली आहेत. त्यामुळे यामागचे नक्की श्रेय कोणाचे? कोण दिशाभूल करत आहे? याबाबत कार्यकर्त्यांसह चिपळूणची जनताही बुचकळ्यात पडली आहे.

ना. सामंत यांच्याकडे सुचविण्यात आलेल्या सुमारे १ कोटी २३ लाखांच्या चिपळूण शहरातील विकासकामांना तात्काळ मंजुरी मिळाल्याचे पत्र शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये चिपळूण शहरातील श्री एकविरा मंदिर ते सागवेकर घरापर्यंत आरसीसी गटाराचे बांधकाम करणे, पाग पॉवरहाऊस रिक्षास्टॉप जवळील नाल्याला आरसीसी रिटनिंग वॉलचे बांधकाम करणे, शिवम अपार्टमेंट ते गणेमंदिर, राऊतआळीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व आरसीसी गटाराचे बांधकाम करणे, असाराम स्वीटमार्ट ते जोगळेकर गादी कारखाना, बाजारपेठपर्यंत रस्ता डांबरीकरण व स्लॅब मोरीचे बांधकाम करणे, चिपळूण न.प. हद्दीतील सागवेकर घर ते वडनाका चौकपर्यंत आरसीसी गटाराचे बांधकाम करणे, लोखंडी गल्ली ते रामतीर्थ मुख्य रस्त्यापर्यंत डांबरीकरण रामतीर्थ मुख्य रस्ता पर्यंत दुतर्फा बाजुला रेलिंग बसविणे, दत्तमंदिर (मध्यवर्ती बसस्थानक ) ते नैसर्गिक नाल्यापर्यंत आरसीसी गटाराचे बांधकाम करणे, खंड पिंपळ गणेशमंदिर येथे पाखाडीचे बांधकाम करणे व रेलिंग बसविणे तसेच स्लाईस ऑफ आर्ट कराड रोड मार्कंडी (नाटुस्कर घर) ते चाळके घरपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे अशी सुमारे सव्वा कोटीच्या आसपास रकमेची कामे पालकमंत्री ना. सामंत यांच्याकडे सुचविण्यात आली आणि त्यांनी जिल्हा नगरोत्थान अंतर्गत मंजुरीदेखील दिली.

परंतु नेमकी ही कामे कोणी सुचवली, याबाबत आता आजी-माजी आमदारांमध्ये चढाओढ सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. कारण आमदार शेखर निकम यांच्या लेटरहेडवर जी कामे सुचविण्यात आली आहेत, तीच कामे जशीच्या तशी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या लेटरहेडवरसुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे 'हे कसे काय' असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात पालकमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या विकासकामांना मंजुरी देऊन चिपळूणच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे. परंतु ही कामे श्रेयवादात तर अडकणार नाहीत ना? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना