mahayuti 
ताज्या बातम्या

अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं?

अखेर महायुतीचं खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. येत्या 24 तासांत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात आता महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. महायुतीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तर विधिमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर महायुतीच्या खातेवाटपावरून खलबतं सुरू आहेत.

महायुतीच्या खातेवाटपात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर महायुतीचं खातेवाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 24 तासांत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल. शिवसेना आपली यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी उद्या देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांत राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाची यादी सादर करणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार कसं असेल खातेवाटप?

  • गृह खाते भाजपकडे राहणार आहे.

  • नगरविकास खाते शिवसेनेकडेच राहणार आहे.

  • अजित पवार गटाला अर्थ खाते मिळणार आहे.

  • महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा हे खाते भाजपच्या ताब्यात राहणार आहेत.

  • शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाणार आहे.

  • भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं. महाराष्ट्रात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महायुतीची सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Lalbaugcha Raja 2025 : मुंबईत गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाभोवती आधुनिक सुरक्षा; एआय तंत्रज्ञानाचा वापर

Uddhav Thackeray : ठाकरे गटाला धक्का; माजी महापौर शिंदे गटात दाखल

Mira Road Accident : जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून 4 वर्षीय बालकाचा मृत्यू

Maharashtra Weather Update: इशारा! पुढील काही दिवस 16 राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज; महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता