प्रत्येकी २० मिनिटानंतर थोडे चाला . त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते. आपल्या शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे पाठीच्या मणक्यावर जास्त प्रमाणात दाबही पडत नाही. बसून काम करण्यासोबतच, उभे राहून काम करण्याचाही सराव ठेवा. त्यामुळे तुमच्या शरीराची सकारात्मक हालचाल होईल. तसेच कामाच्या ठिकाणी जर जास्तवेळा उठता येणे शक्य नसेल तर रोज ३० मिनिटे किमान व्यायाम करा. त्यामुळे या बैठ्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारापासून काही अंशी दूर राहता येऊ शकेल. स्वतःहून प्रयत्नशील राहून दिवसातील प्रत्येक तासाला थोडी हालचाल करा त्यामुळे अश्या हालचालीमुळे तुमचे हृदय आणि एकंदरीत संपूर्ण शरीर हे फिट आणि फाईन राहण्यास मदत होईल.बदलत्या जीवनशैलीबरोबर आता आपल्या काम करण्याच्या शैलीत ही मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. आता अनेक आधुनिक तंत्रज्ञान Modern technology आणि बदलत्या कामाच्या स्वरूपानुसार बऱ्याच प्रमाणात कामाचे स्वरूप ही काहीसे बदलेले दिसत आहे. त्यातच आता डेस्क जॉब किंवा वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध झाल्याने एकूण जॉबच्या प्रमाणात 70 टक्के काम हे एकाच जागी बसून आहे. हे काही काळासाठी आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्याचे आपल्या शरीरावर भयानक परिणाम होऊ शकतात.
विविध आजारांना आमंत्रण
दीर्घकालीन आजाराचे आणि अकाली मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणजे बैठी जीवनशैली आहे. डेस्क जॉब करणारे लोक एका जागी बराचवेळ बसून काम करतात. त्यामुळे त्यांना लठ्ठपणा, पाठदुखी आणि हृदयविकाराचा धोका संभवतो. बराच वेळ एकाच जागी बसून काम केल्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा आजाराचा धोका निर्माण होतो. पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ शकतो. मधुमेह सारख्या रोगांना ही यामुळे आमंत्रण दिले जाते. जास्तवेळ बैठे काम केल्याने मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. यामध्ये नैराश आणि तणावांमध्ये वाढ होते, जास्त वेळ बसून काम केल्याने आपले आयुष्यही कमी होण्याचा धोका निर्माण होतो. एकाच जागी सतत बसून राहिल्याने आपल्या स्नायू आखडतात. आणि त्यामुळे आपल्या शरीराची हालचाल मंदावते. तसेच सतत एका जागी बसून राहण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका सुमारे कितीतरी पटीने वाढतो. यासाठी कोणते उपाय करायचे जाणून घ्या...
प्रत्येकी 20 मिनिटानंतर थोडे चाला . त्यामुळे रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते. आपल्या शरीराची हालचाल चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे पाठीच्या मणक्यावर जास्त प्रमाणात दाबही पडत नाही. बसून काम करण्यासोबतच, उभे राहून काम करण्याचाही सराव ठेवा. त्यामुळे तुमच्या शरीराची सकारात्मक हालचाल होईल. तसेच कामाच्या ठिकाणी जर जास्तवेळा उठता येणे शक्य नसेल तर रोज ३० मिनिटे किमान व्यायाम करा. त्यामुळे या बैठ्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारापासून काही अंशी दूर राहता येऊ शकेल. स्वतःहून प्रयत्नशील राहून दिवसातील प्रत्येक तासाला थोडी हालचाल करा त्यामुळे अश्या हालचालीमुळे तुमचे हृदय आणि एकंदरीत संपूर्ण शरीर हे फिट आणि फाईन राहण्यास मदत होईल.