गजानन वाणी, हिंगोली
महाराष्ट्रासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त अनेक मंदिरांमध्ये भाविक गर्दी करत असतात. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यावर्षी मोठी गर्दी झाली आहे. मध्यरात्री जिल्हाधिकारी अभिनव गोयल, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडत दुग्धाभिषेक घालण्यात आला आहे.
या महापूजेनंतर दोन वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे, मंदिराला सुंदर अशी सजावट आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मध्यरात्री बसूनच भाविकांच्या प्रभू नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत. हर हर महादेव. बम बम भोलेचा गजर करत भाविक नागनाथाचे दर्शन घेत आहेत.