Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!
Learn Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंड येणे, फोडं होणे आणि त्यामुळे खाण्यापिण्याची अडचण होणे हा त्रास अनेकांना वारंवार होतो. शरीरातील उष्णता वाढणे, औषधांचे अति सेवन किंवा इतर कारणांमुळे तोंडात लालसर किंवा पांढऱ्या रंगाचे व्रण तयार होतात. त्यामुळे खाणे, पिणे, बोलणे यामध्ये त्रास होतो. अशा वेळी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात, मात्र त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
अशा त्रासांवर आयुर्वेदामध्ये एक सोपा आणि घरच्या घरी करता येणारा उपाय सांगितला आहे. निर्गुडी या औषधी वनस्पतीच्या पानांचा वापर करून तोंडातील अल्सरवर आराम मिळू शकतो. निर्गुडीच्या पानांमध्ये दाह कमी करणारे, वेदनाशामक आणि बॅक्टेरियाविरोधी गुण असतात.
कसा कराल वापर?
४ ते ५ निर्गुडीची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. ही पाने एका ग्लास पाण्यात घालून उकळावी. पाणी अर्धे राहिल्यावर गॅस बंद करावा आणि गाळून घ्यावे. हे कोमट पाणी दिवसातून २ ते ३ वेळा गुळण्या करण्यासाठी वापरावे. यामुळे तोंडातील फोडांमुळे होणारी जळजळ आणि वेदना कमी होतात. तसेच तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि घशातील सूज व वेदना देखील कमी होतात.
असे मिळतो फायदा :
निर्गुडीची पाने नैसर्गिक अँटीसेप्टिक असून ती तोंडासाठी नैसर्गिक माउथवॉशसारखे काम करते. अल्सरवर थंडावा मिळवून वेदना कमी करण्यासाठी याचा प्रभावी उपयोग होतो. तोंड येणे ही समस्या वारंवार होत असेल तर हा आयुर्वेदिक उपाय करून पहा आणि रसायनमुक्त उपचारांचा अनुभव घ्या. मात्र, त्रास कायमचा असताना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.