भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओप्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस बजावत 72 तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर लोकशाही चॅनल विरोधात हुकूमशाही पद्धतीने करण्यात आलेल्या कारवाही विरोधात हिंगोलीत पत्रकाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत काळ्या फिती बांधून लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या या सरकारचा निषेध केला आहे.
सोमया यांच्या व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू असतानाच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही न्यूज ला नोटीस बजावत 72 तासासाठी चॅनल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रसारमाध्यमांची गळचेपी असून माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप हिंगोलीत पत्रकार संघटनांनी केला आहे, माहिती व प्रसार मंत्रालयाने तात्काळ लोकशाही वरील बंदी हटवावी अशी मागणी निवेदनाद्वारे हिंगोली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय प्रसारण मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.