India-Pakistan War 
ताज्या बातम्या

India-Pakistan War : भारत पाकिस्तान तणाव वाढला; उरी सेक्टरमध्ये गोळीबारात एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Attack) बदला घेण्यासाठी भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले आहे. 7 मे रोजी भारताने दहशतवाद्यांची 9 तळ उद्ध्वस्त केल्यांनतर आता पाकिस्तान आणि भारतातला तणाव वाढताना दिसत आहे. (India-Pakistan War)

यातच पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करून भ्याड हल्ले केले आहेत. जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. दरम्यान, एका पाकिस्तानी पायलटलाही भारतीय सीमेत पकडण्यात आले. पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी अनेक भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आणि सर्व हल्ले हाणून पाडले. भारतानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्र नष्ट केलीत.

जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आणि लाईट बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी भागात सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली आणि एक महिला जखमी झाली. राजरवाणीहून बारामुल्लाला जाणाऱ्या एका वाहनावर मोहुराजवळ गोळीबार झाला. या घटनेत नर्गिस बेगम या महिलेचा मृत्यू झाला, तर रजिक अहमद खान यांची पत्नी हाफिजा जखमी झाली. त्याला ताबडतोब उपचारासाठी जीएमसी बारामुल्ला येथे नेण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Weather Update : महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता

MNS Prakash Mahajan : मनसेला मोठा धक्का! प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा

Latest Marathi News Update live : मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा

Scheduled Caste Reservation Sub Classification : अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण प्रक्रिया; तथ्यांची छाननीसह महत्त्वाच्या जबाबदारी समितीवर