ताज्या बातम्या
MNS Prakash Mahajan : मनसेला मोठा धक्का! प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा राजीनामा
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राणेंना दिलेल्या आव्हानानंतर त्यांना मुंबईत बोलावून समजूत काढण्यात आली होती. त्यावेळी अमित ठाकरे यांनी स्वतः हस्तक्षेप करत महाजन यांची समजूत घातली होती.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घटना मनसेच्या गटातून समोर आली आहे. काही दिवसांपासून प्रकाश महाजन हे पक्षाच्या भूमिकेविषयी नाराज होते. याआधीच ते पक्षातून बाहेर पडण्याच्या विचारात होते, मात्र अखेर त्यांनी अधिकृतरीत्या मनसेला रामराम ठोकला आहे.