सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात सोन्याचे दर 90 हजारांच्या पार गेले आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या आर्थिक धोरणांचा जागतिक सोन्याच्या बाजारावरही परिणाम झालेला दिसून येत आहे.
जळगावमध्ये सोन्याचे दर पहिल्यांदाच 90 हजारांच्या पार गेले असून या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. काल सोन्याचे दर GST सह 90 हजार दोनशेवर गेला. यामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडलंय.