मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छानणी होणार असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. वर्धा, पालघर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरून तक्रारी आल्याचं कारण सांगितलं जात आहे. ही पडळताळणी तक्रारनिहाय केली जाणार असल्याचं देखील आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. यानिमित्ताने केशरी आणि पिवळ कार्ड वगळता सगळ्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.
सुरुवातीला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पळ काढला असून लाडकी बहिण योजनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. १०० दिवसांच्या आराखडा बैठकीनंतर तटकरेंचा काढता पाय काढलेला दिसून येत आहे. "माध्यमांनी संभ्रम निर्माण करू नये"असं म्हणत लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी कपातीवर आदिती तटकरेंचे अजब उत्तर आलेले पाहायला मिळत आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे
मात्र आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला आहे, आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. तसेच पुढे त्या म्हणाल्या की, ज्या काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या बाबींचा विचार करून आपण पुन्हा अर्ज पडताळणी केली जात आहे, त्यामुळे जे दोन वेळा अर्ज भरले गेले आहेत अशा तक्रारींच्या जोरावर आम्ही हे अर्ज पडताळणी करणार आहोत.
मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत नाही, हे अपेक्षित होते- सुप्रिया सुळे
तसेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छानणी होणार या प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अगोदर बोलले होते काल ही बोलले आहे, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत, हे अपेक्षित होते... आरबीआयकडून येणारा राज्याचा फिस्कल डिफेसिट रिपोर्ट मी दोन दिवसांपुर्वी दाखवला आहे... डीपीडीसीचे पैसे वळवले जात आहेत.....