राजकारण

राज्यात मोठा राजकीय भूकंप? काँग्रेस पक्ष फुटणार; भाजपच्या 'या' खासदाराचा दावा

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता भाजपाचे माढ्यातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

रणजितसिंह नाईक निंबाळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुढची 10 वर्ष राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार कायम राहील.पक्षाकडुन जो आदेश येईल. तो मी पाळणार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 50 जागा नक्कीच वाढणार.

तसेच ते पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या आमदार खासदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. या आमदार आणि खासदारांनी त्यांची अस्वस्थता मला खासगीत बोलून दाखवली आहे. त्यामुळे या अस्वस्थतेतूनच काँग्रेस पक्ष फुटणार असून सध्या काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई