Kiran Pawaskar
Kiran Pawaskar

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पाकिस्तानचा झेंडा लावून हार घालतात. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठाच्या उमेदवारांवर गंभीर आरोप केला आहे.
Published by :

Kiran Pawaskar On UBT : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार पाकिस्तानचा झेंडा लावून हार घालतात. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठाच्या उमेदवारांवर गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानचा झेंडा लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पावसकरांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. तसच यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारावरही कारवाई झाली पाहिजे, असं म्हणत किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत किरण पावसकर म्हणाले, क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानचे झेंडे मिरवल्यावर त्यांच्यावर केसेस होतात. निवडणुका आज आहेत, निवडणुका होतील, निवडणुकांचे निकाल येतील. लोकशाहीत जो जिंकणार असेल, तो जिंकेल. पडणार असेल तो पडेल. पण देशाच्या हितासाठी, देशाच्या संरक्षणासाठी आणि देशविघातक अशा पद्धतीने कारवाई होणार असेल, तर कोण हार घालतोय, कोण झेंडे घेऊन मिरवतोय, याच्या मूळाकडे जाऊन सूत्रधार शोधा.

सरकारी यंत्रणा, प्रशासन दिवस-रात्र काम करतं. कोणत्याही धार्मिक संस्था कोणत्यातरी उबाठाचं नाव टाकतं आणि त्यांना मतदान करायला सांगतात. यामागे कोणते लोक आहेत, हे बघायला पाहिजे. याच्यामागे अर्थकारण आहे, हे समजून घ्यायची गरज आहे, अशी प्रतिक्रिया देत पावसकरांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com