राजकारण

अशोक चव्हानांनतर धनंजय मुंडेंचीही मविआच्या महामोर्चाला दांडी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात आज महामोर्चाचे काढण्यात येणार आहे. यात महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह बडे नेते महामोर्चात सहभागी होणार आहे. परंतु, कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण हे सहभागी होणार नाही. यात आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराचे नाव सामील झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार महाविकास आघाडीच्या महामोर्चाला आज उपस्थित राहणार नाहीत. यासंबंधीचे माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आह. या अनुपस्थितीतीचे स्पष्टीकरण दिले आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. माझ्या जन्मगाव नाथरासह मतदारसंघातील बहुतांश गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने मला मोर्चात सहभागी होता येत नाही. आमच्या परळी मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार संजय दौंड व अनेक पदाधिकारी हे उपस्थित आहेत. आम्ही कोणत्याही महापुरुषांचा अवमान खपवुन घेतला जाणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना