राजकारण

भाकरी फिरवायची वेळ आलीय; शरद पवारांच्या विधानाचा अजित पवारांनी सांगितला नेमका अर्थ

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाकरी फिरवायची वेळ आलीय, उशिर करुन चालणार नाही, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी केले आहे. या विधानाचा रोख कुणाकडे यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून नेमका अर्थ सांगितला आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. माझी पण हीच इच्छा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

शरद पवारांनी त्यांच्या कारकीर्दीत असे केले आहे. नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. माझी पण हीच इच्छा आहे. आमदारकी-खासदारकीमध्ये नवीन चेहरे आले पाहिजे. अनेक वर्ष पद्धत आहे नवीन लोक पुढे येतात, काहीजण वय झाल्यावर बाजूला जातात, असे अजित पवारांनी सांगितले आहे.

सरकार बदलाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता मी पण नुसत्या चर्चा ऐकल्या आहेत. न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा राजकीय पक्ष बघतील, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, राज ठाकरे यांनी आपल्या काकांकडे लक्ष ठेवले तसे मी पण माझ्या काकांकडे लक्ष देईन, असा जोरदार टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना सूचक वक्तव्य केले होते. भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर ती करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली आहे. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला