सरकारचं डेथ वॉरंट निघालंय; राऊतांच्या विधानावर अजित पवार म्हणाले, माझी...

सरकारचं डेथ वॉरंट निघालंय; राऊतांच्या विधानावर अजित पवार म्हणाले, माझी...

संजय राऊत यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बारामती : पुढच्या 15 ते 20 दिवसात सरकार गडगडेल. या सरकारचं डेथ वॉरंट निघाले आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या बद्दल काहीही बोलायचे नाहीये. नागपूरनंतर संजय राऊत आणि माझी भेट झालेली नाही. त्यांना कुठली माहिती मिळाली मला माहित नाही. त्यामुळे त्यांनी वक्तव्य कोणत्या आधारे केलं हे माहित नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

सरकारचं डेथ वॉरंट निघालंय; राऊतांच्या विधानावर अजित पवार म्हणाले, माझी...
धक्कादायक! एमपीएससी परीक्षाचे हॉलतिकीट सोशल मीडियावर लीक; 90 हजारांपेक्षा जास्त प्रवेशपत्र अपलोड

उध्दव ठाकरेंची सभा उधाळण्याचा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. सेनेने त्यांना आमदार केलं. त्यांच्यात मतांतर झाले. त्यामुळे त्यांनी म्हंटले की आत शिरावे लागेल. तर बाकीचे म्हणाले की या शिरून दाखवावे. बोलण्याच्या ओघात लोक बोलत असतात. त्यामुळे हे तुम्ही एवढे गांभीर्याने घेऊ नका, असे त्यांनी सांगितले आहे.

तर, खारघर घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी केली. ही मागणी मान्य करायची का नाही हा राज्यसरकारचा प्रश्न आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रम करताना निष्काळजीपणा निश्चितपणे झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यास वेळ काय घ्यावी, लोक मृत झाली. अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर ती चौकशी मी पक्षपाती पद्धतीने होईल असं वाटत नाही. म्हणून आम्ही म्हणालो न्यायालयीन पद्धतीने चौकशी करा, असेही अजित पवार यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, हे सरकार येऊन दहा महिने झाले आहेत. विरोधी पक्ष अनेक कार्यक्रम एकत्रित पद्धतीने केलं आहे. त्यामुळे विरोधकांचे काम आहे टीका करणे. भेगा पडल्या अस सत्ताधारी म्हणणार. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे वक्तव्य करतात. मुख्यमंत्री यांच्यासह 43 मंत्री असतात. पण, आता किती मंत्री आहेत. ते अनेक मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे असे वक्तव्य करीत असतात, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com