राजकारण

नारायण राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा; स्वतःच पाडणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतील अधीश बंगल्यातील बांधकाम स्वतःहून पाडण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नारायण राणेंना तीन महिन्यात बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यानंतर स्वत: राणेंकडून बांधकामावर हातोडा पाडण्यात आला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे अनधिकृत बांधकाम पूर्णतः हटविण्यात येऊन बंगल्याचे नकाशाप्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाणार आहे.

नारायण राणे यांच्या 'अधीश' बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी मुंबई मनपाने नोटीस पाठवली होती. त्यानंतर राणेंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने राणेंना दणका देत दोन आठवड्यात बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. याविरोधात नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयानेही नारायण राणेंना अधिकृत बांधकाम पाडण्यास दोन महिन्यांची मुदत दिली होती. दोन महिन्यांमध्ये तुम्ही स्वत: हे बांधकाम काढा. अन्यथा पुढील कारवाईसाठी बीएमसीला मुभा असेल, असेही सांगितले होते. याप्रमाणे आज नारायणे राणेंकडून आज स्वतः अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अधीश बंगल्याला 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझेड अंतर्गत एनओसी दिली होती. यातील 2 अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका नारायण राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एफएसआय कमी असातनाही 2.12 एफएसआय वापरला गेला, तसंच बंगल्यासाठी 2810 चौरस मीटरची बांधकाम परवानगी असताना 4272 चौरस मीटरचं बांधकाम केल्याने बंगल्यावर कारवाई करण्यात येत आहे. परंतु, महाविकास आधाडी अकसापोटी ही कारवाई करत असल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना