राजकारण

आज देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या घरीच चौकशी; भाजपचं राज्यभर आंदोलन

Published by : Pankaj Prabhakar Rane

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी ११ वा. वांद्रे (Bandra) कुर्ला (Kurla) संकुलातील सायबर (Cyber) पोलीस ठाण्यात (Complex) बोलावलं होतं.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज बीकेसी BKC पोलीस ठाण्यात जाणार नाहीत तर पोलीस (Police) अधिकारीच फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत फडणवीसांनी ट्वीट (Tweet) करत माहिती दिली. बीकेसी पोलीस ठाण्यातले कर्मचारी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जात त्यांचा जबाब नोंदवणार आहेत.

पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी फडणवीसांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर फडणवीसांनीही आपण हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं, पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीसच फडणवीसांच्या घरी जात जबाब नोंदवून घेणार आहेत.
दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Rain Updates: हवामान विभागाचा इशारा; पुढील 7 दिवस 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अर्लट

MI VS KKR: मुंबई इंडियन्सची पुन्हा एकदा पराभव; कोलकाताचा 18 धावांनी विजय, KKR प्लेऑफसाठी पात्र

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."

Daily Horoscope 12 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे आर्थिक समस्या दूर होतील; पाहा तुमचे भविष्य