राजकारण

...तर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवर जगले असते; खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. या दोघांकडूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. एकनाथ खडसेंच्या स्वार्थापोटी त्यांचे जावई जेलमध्ये असल्याचे वक्तव्य भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला आहे.

माझ्या मुलीचा बाप म्हणून कन्यादान केलं त्या जावयाला जेलमध्ये दाबून ठेवायला लाज नाही वाटली नाही का? असा सवाल उपस्थित करत खडसेंनी गिरीश महाजनांवर शरसंधान साधले आहे. माझे वडील जमीनदार होते. त्यामुळे मी कोट्यधीश असणे स्वाभाविक असून साधारण शिक्षकाच्या मुलाकडे जळगाव, मुंबई, जामनेर येथे मालमत्ता कुठून आली याचे उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावे, असे देखील एकनाथ खडसे यांनी म्हंटले आहे. आम्ही मदत केली नसती तर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवर जगले असते, अशी टीका देखील एकनाथ खडसे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

जावई जवळपास दोन-तीन वर्षापासून जेलमध्ये आहे, त्यांना जामीन मिळत नाही. कुटुंबीय कोर्टाने थांबवलं म्हणून सध्या बाहेर आहेत, त्याची कल्पना तुम्हाला आहे. तुमच्या मागे ईडी लागली आहे, हे सर्व लोक बघत आहेत. त्याचे पुरावे देखील आहेत. दहा दहा वेळा सुप्रीम कोर्टात जाऊन तुम्हाला त्यात जामीन मिळत नाही. तुमचा जावई हा गरीब माणूस आहे तो तुमच्यामुळे अडकला आहे. तुमच्या स्वार्थापायी त्याला अडकवण्यात आलं याचे दुःख मलाही आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हंटले होते.

दिनविशेष 22 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

International Day Of Biological Diversity : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस; जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Cardamom: वेलची भिजवून खाल्ल्यास आरोग्याला मिळतात 'हे' फायदे

Devendra Fadnavis: "बालहक्क मंडळाच्या ऑर्डरनुसारच पुढील कारवाई करणार"; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

IPL 2024: "आपल्या सर्वांसाठी एक निराशाजनक हंगाम..."; MIच्या खराब कामगिरीवर नीता अंबानींचं वक्तव्य