राऊतांचे डोके ठिकाणावर नाही; नारायण राणेंचं टीकास्त्र

राऊतांचे डोके ठिकाणावर नाही; नारायण राणेंचं टीकास्त्र

संजय राऊत यांच्या टीकेवर नारायण राणे यांचा पलटवार

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीत मक्का मदिना आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत मुजरा करायला जातात का, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि शिंदे-फडणवीस भेटीवर जोरदार टीका केली होती. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. राऊतांचे नाव घेण्याची इच्छा नाही. त्याची मानसिकता संपली आहे, डोके ठिकाणावर नाही, असे टीकास्त्र नारायण राणेंनी राऊतांवर सोडले आहे.

राऊतांचे डोके ठिकाणावर नाही; नारायण राणेंचं टीकास्त्र
...तर त्याला माफी नाही; 'त्या' घटनेवर फडणवीसांचा कडक शब्दात इशारा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिल्लीला गेले होते. काल ते अमित शाह यांना भेटले. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. राऊतांचे नाव घेण्याची इच्छा नाही. त्याची मानसिकता संपली आहे, डोके ठिकाणावर नाही. कधी काही बोलावे हे कळत नाही. अमित शाह मंत्री व भाजप नेते आहेत. फडणवीस हेही भाजप नेते आहेत. आपल्या नेत्याला भेटणे म्हणजे मक्का व मदिनाला जाणे होईल का? वेडा माणूस म्हटला तरी किती सहन करणार. त्याच्या वेडसरपणावर आमच्याकडे उपाय आहेत, असा निशाणाही त्यांनी राऊतांवर साधला आहे.

संजय राऊत व शिवसेना यांकडे काही काम राहिलेली नाही. यांना चांगलं दिसत नाही. गृहप्रवेश असेल तर शत्रू पण अभिनंदन करतात. तुमची पात्रता व गुणवत्ता नाही, टीका करायची. एकीकडे टीका करायची, तर काम निघाले तर भेटायचे किंवा फोन करायचा. अशी स्वार्थी लोक शिवसेनेत राहिली आहे, असेही नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी टीका झाली. संसद भवन लोकशाहीचे मंदिर समजतो. ब्रिटिशांनी बांधलेले संसद भवनास ७५ वर्षे लोटली. इमारत ही दुरूस्ती करण्यालायक राहिली नव्हती म्हणून नवीन इमारत अडीच वर्षांत उभारले. हे देशाचे आहे, कुठल्याही पक्षाचे नाही. त्यावरही टीका केली. संसद भवनाच्या उदघाटनाला राहुल गांधी यांनी राज्यभिषेक म्हंटले. राहुल गांधी यांचा कधीही राज्याभिषेक होणार नाही. त्यांचे साधे लग्न झाले नाही, तर राज्याभिषेक कसा होईल, असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com