श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर आधी थुंकले अन् आता सारवासारव; राऊत म्हणाले...

श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर आधी थुंकले अन् आता सारवासारव; राऊत म्हणाले...

शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी उत्तर देण्याऐवजी संजय राऊतांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली. यावरुन नवा वाद निर्माण झाला
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी उत्तर देण्याऐवजी थू म्हणत थुंकण्याची कृती केली. यावरुन नवा वाद निर्माण झाला असून राऊतांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यावर आता संजय राऊतांनी सारवासारव केली आहे. थुंकण्यावर बंदी आहे का? असा खोचक सवाल राऊतांनी यावेळी केला. तसेच, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर आधी थुंकले अन् आता सारवासारव; राऊत म्हणाले...
पंकजा मुंडे यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी : एकनाथ खडसे

संजय राऊत म्हणाले की, थुंकण्यावर बंदी आहे का? सरकारने तसा अध्यादेश काढावा. माझ्या जिभेला त्रास झाला. माझ्या घरात मी होतो, माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचे नाव आले आणि जीभ दाताखाली आली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी भाजप समन्वयकांवर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे. भाजप त्यांच्या सोबत गेलेल्या कोणाचाही गळा आवळून खुन केल्याशिवाय राहत नाही. हा आमचा २५ वर्षांचा अनुभव आहे. आम्ही त्यातून मुक्त झालो ही ईश्वराची इच्छा, असे संजय राऊतांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या कृतीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले होते. सत्ता गेल्यामुळे संजय राऊत भ्रमिष्ट झाले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालायं. आज ते फक्त थुंकले उद्या ते रस्त्यावर दगड मारत फिरतील. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या बद्दल भूमिका जाहीर करावी. संजय राऊतांमुळे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावली, अशी टीका त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com