Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

ठाकरे, शिंदे गटाचे नाव ठरले; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Published by : Sagar Pradhan

राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड गोंधळ सुरु आहे. अशातच शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षाच नाव आणि चिन्हावरून जोरदार घमासान सुरु आहे. अशातच आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे तर या उद्धव ठाकरे यांच्या गटाचे चिन्ह मशाल असणार आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. मात्र, यावेळी शिंदे गटाला निवडणूक आयोगाने धक्का देत आणि शिंदे गटाचे तिन्ही चिन्ह आयोगाने नाकारलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis: "बालहक्क मंडळाच्या ऑर्डरनुसारच पुढील कारवाई करणार"; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

IPL 2024: "आपल्या सर्वांसाठी एक निराशाजनक हंगाम..."; MIच्या खराब कामगिरीवर नीता अंबानींचं वक्तव्य

CNG : पंपांवर सीएनजीचा तुटवडा; गेल्या 3 दिवसांपासून गॅस उपलब्ध नाही

Health Tips: बदलत्या ऋतुमध्ये अशा प्रकारे घ्या स्वतःची काळजी

Sanjay Shirsat: श्रीमंत लोकांच्या माजलेल्या मुलांवर...; काय म्हणाले संजय शिरसाट?