राजकारण

राहुल गांधींना देशाबाहेर हाकलले पाहिजे; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा घणाघात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भोपाळ : मध्य प्रदेशच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या आहेत. राहुल परदेशात सांगतात की आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. अशा राहुल गांधींचा मला तिरस्कार आहे. त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, अशी टीका साध्वी प्रज्ञा यांनी केली आहे.

साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, संसदेत चांगले काम सुरू आहे. सर्व काही ठीक आहे, पण काँग्रेसचे लोक सरकार चालू देत नाहीत. संसदेचे कामकाज चालू दिले जात नाही. त्यांची संसद चालली तर आणखी काम होईल, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे, पण त्यांची बुद्धिमत्ताही भ्रष्ट होत आहे. तुम्ही (राहुल गांधी) तुमच्या देशाचे नेते आहात. तुम्हाला जनतेने निवडून दिले आहे. तुम्ही जनतेचा आणि देशाचा अपमान करत आहात.

तुझी आई इटलीची असल्याने तू भारतातील नाहीस हे आम्ही मान्य केले आहे. आम्ही म्हणालो नाही, चाणक्याने म्हटले आहे की, परकीय स्त्रीच्या पोटी जन्मलेला मुलगा कधीही देशभक्त होऊ शकत नाही. संसदेने आणि भारतातील जनतेने तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिले आहे. इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार होते. तुम्ही देश पोकळ केला आहे, असे टीकास्त्र साध्वी प्रज्ञा यांनी राहुल गांधींवर सोडले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी नुकतेच लंडनमधील हाऊस ऑफ संसदेच्या आवारात ब्रिटीश खासदारांशी संवाद साधला होता. आमचे माइक खराब नाहीत, ते काम करत आहेत, पण तरीही तुम्ही ते चालू करू शकत नाही. कारण जेव्हा मी संसदेत माझा मुद्दा मांडतो तेव्हा तिथे अनेकदा असे घडले आहे. भारतात विरोधकांना दाबले जात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हंटले होते.

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया