प्रिय निलू बाळा...; निलेश राणेंच्या टीकेला सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

प्रिय निलू बाळा...; निलेश राणेंच्या टीकेला सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका; सुषमा अंधारेंनी घेतला समाचार

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निलेश राणे यांनी टीकास्त्र डागले होते. या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रिय निलू बाळा असा सुषमा अंधारेंनी उच्चार करत निलेश राणेंचा समाचार घेतला आहे.

प्रिय निलू बाळा...; निलेश राणेंच्या टीकेला सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर
राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट! हवामान विभागाने 'या' जिल्ह्यांना दिला इशारा

प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात भाजपा अन् राज्यात ईडी सरकार आले. तरीही शिवसेना भवनच्या समोर हिंदुत्वासाठी आक्रोश मोर्चा काढावा लागत असेल, तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे ते बदलावेच लागेल नाही का, असा निशाणा सुषमा अंधारे यांनी निलेश राणे यांच्यावर साधला आहे.

काय म्हणाले होते निलेश राणे?

बारामती लोकसभा - खासदार सुप्रिया सुळे

६ पैकी २ आमदार - NCP

अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री

पवार साहेब स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग

स्थानिक सर्व बॉडी - NCP

एवढं असून जर आंदोलन करावं लागतं तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील, अशी टीका राणेंनी केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com