Navneet Rana | Sushma Andhare
Navneet Rana | Sushma Andhare Team Lokshahi

नवनीत अक्का, उद्धव ठाकरेंना बोलतांना इथून पुढं ध्यानात ठेवायचं; सुषमा अंधारेंचा इशारा

अमरावतीत सुषमा अंधारे यांची तुफान फटकेबाजी

सूरज दहाट | अमरावती : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा ह्या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. याचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची खिल्ली उडवत त्यांना इशारा दिला. सुषमा अंधारेंनी नवनीत राणा यांचा अक्का असा उल्लेख केला.

Navneet Rana | Sushma Andhare
'निवडणूक आयोगाने राजकीय मालकांसाठी ‘कॉण्ट्रक्ट किलर’ पद्धतीने काम केले'

ईडी, सीबीआय, निवडणूक आयुक्तांना कामाला लावलं आहे त्याला उद्धव ठाकरे म्हणतात. नाद करायचा नाही तर एवढे सगळे कामाला लागले असतानाही जो हटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते. त्याला उद्धव ठाकरे म्हणतात. तर आता उद्धव ठाकरेंवर बोलतांना टीका करतांना नीट ध्यानात ठेवायचं, असा इशारा अंधारे यांनी नवनीत राणा यांना दिला. यावेळी नवनीत राणा यांचे जुने व्हिडीओ सभेत दाखवत अंधारे यांनी राणा यांचा समाचार घेतला.

जर नवनीत राणा यांना वाटत असेल. त्या फार हुशार फक्त आहेत. सुंदर अॅक्टर आहेत. तर नवनीत राणा यांनी गैरसमज काढून टाकावे. नवनीत अक्का तुम्ही कधी चांगल्या अभिनेत्री नव्हत्या. तिकडे तुमचं बॉक्स ऑफिसवर काहीच चाललं नाही म्हणून तुम्ही बोगस जात प्रामाणपत्र बनवून इकडे आल्या. नाही तर तुम्ही बिनकामाची स्टंटबाजी व नौटंकी केली नसती, असा टोला सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा लगावला. शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्यासाठी राडा केला पण भगतशिंग कोशारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा नवनीत राणा गप्पा का बसल्या, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com