Navneet Rana
Navneet Rana Team Lokshahi

पालक दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी पाठवतात अन् तिथे मुली मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिप...- नवनीत राणा

मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली?
Published by :
Sagar Pradhan

नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आता त्यांनी ‘लिव्ह इन रिलेशन’बाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जीवनात कधीही’लिव्ह इन रिलेशन’बाबत ऐकलं नाही. परंतु, आजच्या पिढीकडून सगळं ऐकायला मिळते आहे. आई-वडील मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. पण तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात, अशा प्रकारचे विधान त्यांनी केले आहे. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.

Navneet Rana
वॉटर टँकर असोसिएशने संपानंतर मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी आमदार सुनील प्रभूंचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय असतं? हे मी माझ्या जीवनात कधीही ऐकलं नाही. मीही याच पिढीची आहे. परंतु, या पिढीकडून ऐकते की मुलं-मुली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली? असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

पुढे त्या म्हणाल्या की, मी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर हे पाहत असते. याचं माझ्या मनात कुठेना कुठे तरी दु:ख आहे. आपल्या तरुण पिढीत ही गोष्ट नेमकी कुठून आली? आपण स्वावलंबी झालो आहोत. पण आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं आहे. म्हणून आपण या पदापर्यंत पोहोचलो. थोडे पैसे कमवायलो लागलो म्हणून असं वागायच. ही आपली संस्कृती नाही. आई-वडिलांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. आता आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. देवाने प्रत्येकाला काही ना काही तरी करायला पाठवलं आहे. समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. समाजाने आपल्याला राहण्याची पद्धत शिकवली. समाजाने आपल्याला नाव दिलं. त्यामुळे समाजाचं आपणही काहीतरी देणं राखतो. आपण समाजासाठी किमान दहा टक्के दिलं तरी खूप झालं, हे करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. असे विधान त्यांनी यावेळी केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com