Raj Thackeray
Raj Thackeray  Team Lokshahi
राजकारण

अंधेरी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार; म्हणाले, उमद्या राजकीय...

Published by : Sagar Pradhan

काल अंधेरी पोटनिवडणुकीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी ही पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली असून ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यावरच आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आभार मानण्यासाठी पत्र लिहले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे पत्रात?

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व)च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार, अश्या शब्दात त्यांनी भाजपचे आभार मानले आहे.

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई

Dengue: राज्यात मागील पाच वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस