राजकारण

महाविकास आघाडीच्या काळातच राजकारण मुद्द्यावरून गुद्द्यांवर; मुनगंटीवार टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कटुता संपवण्याच्या वक्तव्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्वागत केले. यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मागील अडीच वर्षात राजकारण मुद्द्यावरून गुद्दयावर गेले, असा टोला संजय राऊतांना लगावला आहे.

शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने मोठी कारवाई करत प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमण पाडले आहे. याविषयी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. तो दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. माँ जिजाऊंनी अफजलखानाचे डोकं पुरायला सांगितले. २९ जुलै १९५३ रोजी एक संस्था स्थापन केली. अफजलखानाचे उदात्तीकरण करण्याचे काम संस्थेने केले. संस्थेने काही अतिक्रमण केली होती. वन विभागाने आज ती काढली. न्यायालयाने काही सूचना व आदेश केले होते. आज शिवप्रताप दिनी अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. मागील सरकारमध्ये ५ मे २००८ रोजी या समाधीला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही त्यांनी केला.

अनेक उदाहरणे राज्याने पाहिली आहेत. मुंडेंविरोधात विलासराव देशमुखांची चर्चा व मैत्री आपण पाहिली आहे. गेल्या अडीच वर्षात राजकारण मुद्द्यावरून गुद्दयावर गेले. टोपण नाव विकसित केली. मोठे नेते काही शब्द वापरायचे. देवेंद्र फडणवीसांनी एक मुद्दा पुढे ठेवला, सामनाने त्याची री ओढली. राऊत यांनी तोच मुद्दा घेतला, त्याचे स्वागत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी भुजबळांना जवळ बसवले. ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली. आयुष्यात भुजबळ यांना संपर्क होऊन देणार नाही, असे बाळासाहेब म्हटले होते. मात्र मुलाला ते सांगायचे विसरले, असा टोला त्यांनी लगावला आहे.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही