राजकारण

उद्धव ठाकरे यांचा ढोंगी आणि लबाड स्वभाव महाराष्ट्राला समजला आहे

उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईत बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

Published by : shamal ghanekar

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईत बुधवारी मोर्चा काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर सुरू असलेल्या कारवाया तत्काळ थांबवाव्यात, दडपशाहीला शिवसैनिक घाबरणार नाही. कारवायांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलने करणार आहोत, असा इशाराही शिवसेना नेत्यांनी दिला. मात्र त्यानंतर नवी मुंबई मराठा समाजकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध आणि वायरल करत उध्दव ठाकरे गटावर शरसंधान साधले आहे.

शिवसेनेचा कार्यकर्ता उघडपणे गुंडगिरी करत असून अशी गुंड प्रवित्तीच्या लोकांना धडा शिकवायला नको का असा सवाल व्हिडिओच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. यावर बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणतात, की उद्धव ठाकरे भावनिक वातावरण तयार करत त्याचा कसा फायदा घेता येईल हाच त्यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांचा ढोंगी आणि लबाड स्वभाव महाराष्ट्राला कळाला आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा मोर्चा काढला तो व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गुंडगिरी करतो, अशा व्यक्तीसाठी मोर्चा काढण्याचे आदेश तुम्ही देता ? या महाराष्ट्राला शेतकऱ्याचां पोरगा मुखमंत्री म्हणून लाभला आहे. लोकांना त्यांच्याकडून खूप आशा आहेत. तुमच्यासारखे घरात बसणारे ते मुख्यमंत्री नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र असे मोर्चे काढून वातावरण बिघडवण्याचे काम करत असाल तर मराठा युवासेना याला जशास तसे उत्तर देईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी दिला.

'पोलिसांवर दबाव आणल्यास प्रतीमोर्चा काढणार'

पोलिसांनी नियमाप्रमाणे केलेल्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही. आंदोलनाच्या नावाखाली दबाव आणण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे सेनेकडून सुरू असून, अशाप्रकारे दबाव निर्माण केल्यास आम्हालाही पोलिसांच्या समर्थनार्थ प्रतीमोर्चा काढावा लागेल, असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी दिला.

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'तुतारी'बाबत मोठा निर्णय

निवडणूक आयोगचा पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, 'ट्रंम्पेट' चिन्हाचे मराठी भाषांतर 'ट्रंम्पेट'

'जरांगेंच्या डोक्यात आता राजकारणाचं वारं शिरलंय' प्रविण दरेकरांची जरांगेंवर टीका

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; कारण काय?

Sada Sarvankar | अमित ठाकरेंनी अर्ज मागे घ्यावा, राज ठाकरे यांना भेटून विनंती करणार : सदा सरवणकर