धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महंत नामदेव शास्त्री महाराज म्हणाले की, याची मला पूर्ण कल्पना नव्हती पहिल्यादिवशी. दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार जो गडाचा शिष्य आहे, गडाला मानणारा आहे. तो आल्यानंतर त्याने मला याची जाण करुन दिली. त्याने माझी भावना बदलली.
मला जाण निर्माण झाली. भगवान गड त्या कुटुंबाच्या पाठिशी आहे. लोकांनी गैरसमज करु नये. मला जाण झालेली आहे. न्यायालयाला प्रार्थना आहे की, आपण लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवून त्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. असे महंत नामदेव शास्त्री म्हणाले.