थोडक्यात
राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरला
अनेक शहरांचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस
उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट
राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे. तीन दिवसांपासून अनेक शहरांचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविले जात असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर पूर्व दिशेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरला आहे.
यासोबतच काही जिल्ह्यांत किमान तापमान 10अंश सेल्सिअसच्या खाली नोंदविण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत थंडी कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यासह मुंबईत किमान तापमानाचा पारा घसरला असून मुंबईत कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ उतार सुरु आहेत.